पुणे पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आला आहे तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुणे पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आला आहे.
पुणे पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच
अजित पवार,चंद्रकांत पाटील (डावीकडून)
Published on

पुणे : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आला आहे तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुणे पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवारांना पालकमंत्री करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राला २०२४ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला कोणती खाती दिली जातील? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पण आता पालकमंत्रीपदासाठीदेखील महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे.

गेल्यावर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला तेव्हा देखील पुणे पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच बघायला मिळाली होती.

अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांची पुणे पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्याऐवजी अजित पवार यांना पुणे पालकमंत्रीपद मिळाले होते. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. यावेळी देखील पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे कुणाला पालकमंत्रीपद मिळतं? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. भाजपला अधिक मत मिळाल्याने त्यांचे वर्चस्व अधिक आहे.

तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता ज्याचे प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच आहे की, माझे श्रेष्ठी मला जे सांगतात ते मी करतो. तसेच कार्यकर्त्याचे काय नेत्याचेसुद्धा आपल्याला अधिकाधिक चांगले पद मिळावे, अशी इच्छा व्यक्त करत असतो. पण आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ शकत नाही.

- चंद्रकांत पाटील

logo
marathi.freepressjournal.in