आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून केलं लेकीचंच अपहरण; जावयालाही बेदम मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

‘सैराट’ चित्रपटातील दृश्यांची आठवण करून देणारी एक हृदयद्रावक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, खरपुडी गावात घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका विवाहित तरुणीचे तिच्या कुटुंबीयांनीच भरदिवसा अपहरण करून, तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून केलं लेकीचंच अपहरण; जावयालाही बेदम मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना
Published on

पुणे : ‘सैराट’ चित्रपटातील दृश्यांची आठवण करून देणारी एक हृदयद्रावक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, खरपुडी गावात घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका विवाहित तरुणीचे तिच्या कुटुंबीयांनीच भरदिवसा अपहरण करून, तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि २८ वर्षीय प्राजक्ता गोसावी या दाम्पत्याने समाजाच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेमविवाह केला होता. विश्वनाथ गोसावी हे हिंदू गोसावी जातीचे तर प्राजक्ता मराठा हिंदू असल्याने प्राजक्ताच्या कुटुंबाने आणि नातेवाईकांनी या लग्नाला कडाडून विरोध केला होता. "आम्ही उच्च आहोत, तुम्ही आमचे नाक कापले आहे, आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुम्हाला ठार मारू, " अशा धमक्या प्राजक्ताच्या कुटुंबीयांकडून वारंवार दिल्या जात होत्या.

विश्वनाथ गोसावी हे १४ एकर शेतीचे मालक असून अनेक व्यवसाय करतात, तर प्राजक्ता इन्फोसिसमध्ये 'लिड मॅनेजर' पदावर कार्यरत आहे. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास, प्राजक्ताचे कुटुंबीय खरपुडी गावात आले. प्राजक्ता इमारतीवर असताना, विश्वनाथ यांना तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला.

जिन्याने वर जात असताना, त्यांनी प्राजक्ताचा भाऊ गणेश काशीद आणि तिची आई सुशीला काशीद, यांच्यासह इतर काही गुंड प्राजक्ताला फरफटत, घेऊन जात असल्याचे पाहिले. विश्वनाथ यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता, प्राजक्ताच्या भावाने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली आणि प्राजक्ताला जबरदस्तीने घेऊन हे सर्वजण प्रसार झाले.

पतीला जीवाची भीती

या घटनेनंतर विश्वनाथ गोस्वामी यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपली पत्नी प्राजक्ता धोक्यात असून तिच्या जीवाला धोका असल्याचे विश्वनाथ यांनी सांगितले आहे. "माझ्या पत्नीचा दगाफटका तर झाला नाही ना," अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरात वारंवार पोलिसांना कळवूनही ठोस कारवाई न झाल्याने आपल्या पत्नीचे अपहरण झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in