पुणे जेएम रोड बॉम्बस्फोट प्रकरण : तुरुंगवासानंतर आरोपीला दिलासा; जामीन मंजूर

२०१२ मध्ये पुण्यातील जेएम रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने १३ वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या आरोपी फारुख शौकत बागवान याला जामीन मंजूर केला.
पुणे जेएम रोड बॉम्बस्फोट प्रकरण : तुरुंगवासानंतर आरोपीला दिलासा; जामीन मंजूर
Published on

मुंबई : २०१२ मध्ये पुण्यातील जेएम रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने १३ वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या आरोपी फारुख शौकत बागवान याला जामीन मंजूर केला. अन्य आरोपीना जामीन मिळालेला असल्याने समानतेचे तत्व बागवान यालाही लागू होते व त्यालाही जामीन मिळण्याचा अधिकार आहे. असे जामीन मंजूर करताना स्पष्ट केले.

पुण्यातील जेएम रोडवर १ ऑगस्ट २०१२ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेअकरा या कालावधीत पाच कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यात एकजण जखमी झाला होता. तर, जंगली महाराज रोडवरील सायकलच्या कॅरिअर बास्केटमध्ये सापडलेला सहावा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. सुरुवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर प्रकरण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) वर्ग करण्यातआला.बाॅम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या फारुख शौकत बागवान याने ऍड. मुबीन सोलकर यांच्या मार्फत जमिना साठी हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी राज्य सरकारने याचिकेला जोरदार आक्षेप घेतला.बागवान याच्या कबुलीजबाबाचा दाखला देऊन कट रचण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा आरोप सरकारी वकिलांनी केला.तसेच त्याच्या विरोधात स्फोटके कायदा, शस्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) यासह अनेक गंभीर कायदयातर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

यावेळी आरोपीच्या वतीने ऍड मुबीन सोलकर यांनी प्रकरणातील सहआरोपी मुनीब इक्बाल मेमन याला २०२४ मध्येच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होतायाकडे न्यायलायचे लक्ष वेधले. तसेच या प्रकरणा व्यतिऱीक्त बागवान याच्याविरोधात अन्य कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याला अटक झाल्यानंतर सुमारे १३ वर्षांहून अधिक काळापासून तो कारागृहात आहे.

खटल्यातील १७० साक्षीदारांपैकी आतापर्यंत २७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून खटला नजीकच्या काळात निकाली निघण्याची शक्यता फारच कमी आहे, असे सोलकर यांनी निदर्शनास आणून दिले.

logo
marathi.freepressjournal.in