Pune : केतन अगरवालच्या आजोबांचे निधन

केतन अग्रवालच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या अगरवाल कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे.
Pune : केतन अगरवालच्या आजोबांचे निधन
Pune : केतन अगरवालच्या आजोबांचे निधन
Published on

पुणे : केतन अग्रवालच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या अगरवाल कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. नातवाच्या मृत्यूनंतर अवघ्या १७ दिवसांनी, केतनचे आजोबा देवीचंद अगरवाल यांचे शनिवारी रात्री पुण्याच्या एका रुग्णालयात निधन झाले.

काही दिवसांपूर्वीच देवीचंद अगरवाल यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर केतनच्या मृत्यूची घटना घडल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. नातवाच्या निधनानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.

Pune : केतन अगरवालच्या आजोबांचे निधन
लग्न करायचे नव्हते तर सियाने तसे का सांगितले नाही? केतन अगरवालच्या वडिलांचा शोकसंतप्त सवाल

दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७१ वर्षांचे होते. नातवाच्या जाण्याचे दुःख त्यांना असह्य झाले होते आणि त्याचाच त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in