Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामधून केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक व खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.
Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Published on: 

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामधून केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक व खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी लोहगडावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींना तसेच या प्रकरणात मध्यस्थी करू पाहणाऱ्यांना सरळ जीवे मारण्याची आणि लोहगडावरून खाली फेकून देण्याची धमकी दिल्याची गंभीर बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.

पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार, आरोपी सिया गोयल ही दहावीत असताना तिचे शाळेतील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सिया दुसऱ्या मुलाच्या म्हणजेच चेतन चौधरीच्या प्रेमात पडल्याचे समजताच या जुन्या प्रियकराने तिच्याशी असलेले नाते तोडले होते. आता केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सियाचे नाव पुन्हा एकदा चेतन चौधरीसोबत जोडले गेल्याचे समोर आल्यानंतर, या माजी प्रियकराने पोलिसांसमोर हजर होऊन या जुन्या प्रसंगांची माहिती दिली आहे.

केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी आरोपपत्रातील माहितीचा हवाला देत या प्रकरणात साक्षीदारांवर आणल्या जाणाऱ्या दबावावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. घटना घडताना पाहिलेल्या एका महिला साक्षीदारासह इतर प्रत्यक्षदर्शींना आरोपींनी ‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’ असा स्पष्ट इशारा दिला होता. हे आरोपी अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते एकटे एवढा मोठा गुन्हा करूच शकत नाहीत, तर या संपूर्ण कटामागे सियाचे आई-वडील, भाऊ साहिल यांचा थेट पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप विशाल अग्रवाल यांनी केला आहे. आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयात साक्ष नोंदवू न देण्यासाठी प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचे आणि साक्षीदार फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

...तर सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या असत्या- विशाल अग्रवाल

विशाल अग्रवाल यांनी म्हटले की, सियाला केतनसोबत लग्न करायचेच नव्हते, तर केतनची हत्या करण्याची काय गरज होती. जर एखाद्या मुलीची हत्या झाली असती तर सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या असत्या, मात्र एक निष्पाप मुलगा बळी पडल्यामुळे कोणीही पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीहे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून मुख्य आरोपींसह या कटात सामील असलेल्या सर्वांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in