Pune : घरात घुसून तरुणीवर अत्याचार; पोलिसांची १० पथके आरोपीच्या शोधात

कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून दहा पथके शोधासाठी सक्रिय केली आहेत.
Pune : घरात घुसून तरुणीवर अत्याचार; पोलिसांची १० पथके आरोपीच्या शोधात
Published on

पुणे : कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून दहा पथके शोधासाठी सक्रिय केली आहेत.

पीडित तरुणी ही मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, गेली दोन वर्षे पुण्यात तिच्या भावासोबत राहत आहे. ती कल्याणीनगरमधील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या वेळी तिचा भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेला होता व ती घरात एकटीच होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका अज्ञात इसमाने दरवाजा वाजवून आपली ओळख 'कुरिअर बॉय' म्हणून करून दिली. त्याने 'बँकेचे कागदपत्र' असल्याचे सांगून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. पीडितेने प्रथम नकार दिला, परंतु "स्वाक्षरी हवी आहे" असे सांगून त्याने तिला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर, अचानक तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारून ती बधीर झाल्यावर त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरात घुसून त्याने धमकी देत अत्याचार केला. तो इतक्यावरच न थांबता, त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि "मी परत येईन" असा संदेशही तिच्या मोबाईलमध्ये लिहून ठेवल्याचे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in