Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी जामकर (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते.
Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी जामकर (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी जामकर हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणांवरून तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पैशांसाठी सातत्याने दबाव आणून तिचा मानसिक छळ केला जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in