Pune Metro : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाला अखेर मंजूरी

या कामासाठी अंदाजे ९१० कोटी रुपयांचा खर्च येणार असून ४.१३ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे.
Pune Metro : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार!  पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाला अखेर मंजूरी

गेल्या अनेक वर्षापासून पुणेकरांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. पुण्यातील पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता लवकरच पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाचं काम सुरु होऊन या मार्गावरुन मेट्रोल धावेल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या कामासाठी अंदाजे ९१० कोटी रुपयांचा खर्च असून ४.१३ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे.

पुणेकरांना गेल्या अनेक वर्षापासून या मेट्रो मार्गाची प्रतिक्षा होती. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, उमा खापरे, आश्विनी जगताप यांनी तातत्याने पाठपुरावा केला होता. या नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून अखेर पिंपरी ते निगडी हा ४.१३ किमी लांबीचा मेट्रोमार्ग मंजूर झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in