दिवाळीपूर्वी पुणे मंडळाची लॉटरी; पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांची माहिती

म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत विविध प्रकल्पांतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या अंतर्गत लॉटरी जाहीर केली आहे. तसेच मंडळाकडे एक हजाराहून अधिक घरे उपलब्ध असून यामध्ये आणखी काही घरांचा समावेश करून दिवाळीपूर्वी पुणे मंडळाची लॉटरी काढण्याचे नियोजन असल्याचे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी पुणे मंडळाची लॉटरी; पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांची माहिती
Published on

मुंबई : म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत विविध प्रकल्पांतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या अंतर्गत लॉटरी जाहीर केली आहे. तसेच मंडळाकडे एक हजाराहून अधिक घरे उपलब्ध असून यामध्ये आणखी काही घरांचा समावेश करून दिवाळीपूर्वी पुणे मंडळाची लॉटरी काढण्याचे नियोजन असल्याचे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, ताठवडे, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ४ हजार ८५० सदनिकांच्या विक्रीकरिता पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गुरुवारी संगणकीय लॉटरी काढण्यात आली. ४ हजार ८५० सदनिकांपैकी २ हजार ४२७ सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत ३ टप्प्यांमध्ये विभागण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील १ हजार ३७२ सदनिकांकरिता ४६ हजार ४७७ प्राप्त अर्जांची लॉटरी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील १०३७ सदनिकांकरिता प्राप्त ३९ अर्जांची सोडत काढण्यात आली. म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत १८ सदनिकांकरिता प्राप्त १६ अर्जांची सोडत काढण्यात आली.

याप्रसंगी बोलताना पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी संगितले की, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २४२३ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत जाहीर केली असल्याने यासंदर्भात अर्जदारांनी थेट मंडळाशी संपर्क करावा. तसेच लवकरच पुणे मंडळातर्फे पुढील सदनिका विक्री लॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी जाहीर केले.

गृहनिर्मितीला वेग देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील

देशातील प्रत्येक बेघर नागरिकाला हक्काचा निवारा मिळावा, याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या आवृत्तीतून देशात तीन कोटी घरे निर्माण करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीने राज्यात जास्तीत जास्त घरे निर्माण होण्यासाठी गृहनिर्मितीला वेग देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in