पुणे : भाड्याच्या घरी कपडे धुण्यासाठी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील असून नोकरी निमित्त पुण्यात राहतो.
पुणे : भाड्याच्या घरी कपडे धुण्यासाठी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील आहे. तो नोकरी निमित्त पुण्यात असून, हांडेवाडी परिसरात एकटा राहतो. लोणी काळभोर परिसरातील एका 17 वर्षांच्या मुलीला कपडे धुण्यासाठी बोलवून घेत त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे समजते.

याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सुदर्शन शेरमाळे याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात आरोपी शेरमाळे याने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या बहाण्याने त्याच्या भाड्याच्या घरी बोलवून घेतले आणि तिच्यासोबत बळजबरी करीत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर त्याने तीन वेगवेगळ्या दिवशी देखील हेच कृत्य करीत मुलीवर अत्याचार केला. तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in