पुण्याला आणखी तीन महापालिकांची गरजच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी आणि वाढते नागरीकरण पाहता पुण्याला आणखी तीन मनपांची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तीन मनपां’ची गरज नाही, असे सांगून हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
पुण्याला आणखी तीन महापालिकांची गरजच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद
Published on

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी आणि वाढते नागरीकरण पाहता पुण्याला आणखी तीन मनपांची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तीन मनपां’ची गरज नाही, असे सांगून हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड दौरा केला. तेथे त्यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज व्यक्त केली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांचाही उल्लेख केला. मात्र, अजित पवारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे दौऱ्यावर आले होते, त्यांना तीन महापालिकांसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्याची लगेच निकड नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पुण्यातील महापालिकांवरुन वेगवेगळे मत असल्याचे पाहायला मिळाले.

logo
marathi.freepressjournal.in