बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरण: पार्थ पवार, शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांकडून ‘क्लीनचिट’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या 'अमेडिया एन्टरप्रायझेस एलएलपी' कंपनीशी संबंधित जमीन गैरव्यवहार प्रकरणांनी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी खुलासा करत मोठा 'ट्विस्ट' आणला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांना 'क्लीन चिट' दिली आहे.
बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरण: पार्थ पवार, शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांकडून ‘क्लीनचिट’
Published on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या 'अमेडिया एन्टरप्रायझेस एलएलपी' कंपनीशी संबंधित जमीन गैरव्यवहार प्रकरणांनी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी खुलासा करत मोठा 'ट्विस्ट' आणला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांना 'क्लीन चिट' दिली आहे.

कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आल्याची चर्चा होती. हा दुसरा व्यवहार पुण्यातील बोपोडी येथील होता. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या जमीन व्यवहारांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी आता बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात 'यू-टर्न' घेतला आहे. अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा या प्रकरणात संबंध नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे बोपोडी जमीन प्रकरणातून कुलमुख्त्यारधारक शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडिया कंपनी) यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एकाच एफआयआरमध्ये दोन जमिनीची प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना या बोपोडी प्रकरणात अप्रत्यक्ष क्लीन चिट देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून अद्यापही करण्यात येत आहे. पोलिसांनी मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरण वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे, तसेच मुंढवा प्रकरणाचा तपास सुरू आहे.

फक्त मुंढव्याप्रकरणी चौकशी होणार

पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा बोपोडी आणि मुंढवा या दोन जमीन घोटाळ्यांची संबंधित असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, आता या यातील फक्त मुंढव्याच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी होईल, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे

logo
marathi.freepressjournal.in