Pune : कोयता गॅंगवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी जाहीर केली बक्षिसे; अजित पवार म्हणाले...

कोयता गॅंगवर लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune) अनोखी शक्कल लढवली असून अजित पवारांनी (Ajit Pawar) मात्र यावर टीका केली आहे.
Pune : कोयता गॅंगवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी जाहीर केली बक्षिसे; अजित पवार म्हणाले...

पुण्यामध्ये (Pune) कोयता गॅंगची दहशत काही संपत नाही आहे. अशामध्ये आता त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) बक्षिसे जाहीर केली आहेत. पोलिसांनी जाहीर केले आहे की, कोयता गँगच्या सदस्याला पकडून देणाऱ्याला ३,००० रुपयांचे बक्षीस, तर बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडून देणाऱ्याला १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यानंतर विरोधीपक्षनेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, "जसे गब्बर सिंग, वीरप्पनवर बक्षिसे लावली गेली होती, तसे इथे करण्याची काय गरज आहे? हे मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणार आहे." पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांच्या या निर्णयावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यावेळी म्हणाले की, "एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सापडत नसेल तेव्हा अशा प्रकारची बक्षीसे जाहीर केली जातात. वीरप्पन सापडत नव्हता म्हणून त्याच्यावर बक्षीस लावण्यात आले होते. कधीकधी चित्रपटांमध्येही आपण पाहिले की गब्बर सिंगवर बक्षीस लावले होते. पण सातत्याने अशा गोष्टी होत असतील तर मग पोलिसांपुढे प्रश्न निर्माण होईल. कारण कायदा सुव्यवस्था चांगला ठेवणे हे त्यांचे काम आहे. असे आमीष दाखवून किंवा बक्षीस जाहीर केल्यानंतर एखादा पोलीस म्हणेल की एखाद्यावर बक्षीस लागेल तेव्हाच मी तपास करेन. हे जे बक्षीस सुरु करण्यात आली आहेत, त्यामागे काय कारण आहे? नवे पायंडे का पाडत आहेत?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in