पुण्याजवळ अपघातात २ ठार; १२ जखमी

पुणे-बंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने टेम्पोला धडक दिल्यानंतर अन्य वाहनांनाही धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
पुण्याजवळ अपघातात २ ठार; १२ जखमी
पुण्याजवळ अपघातात २ ठार; १२ जखमी'एआय' ने संपादित केलेली प्रतिमा
Published on

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने टेम्पोला धडक दिल्यानंतर अन्य वाहनांनाही धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली.

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पुढे असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक आणि टेम्पो दोन्ही वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकत गेली आणि तेथून जाणाऱ्या दोन कारला धडकली. या अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर जखमी झालेल्या डझनहून अधिक जणांना उपचारा-साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी हृदयनाथ मोहन गायकवाड (४७) आणि आनंदीबाई रामचंद्र वडकर (५०) यांचा उपचा-रादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी ट्रकचालक प्रमोद विठ्ठल वाघ (४०) आणि ट्रकचा मालक संदीप गोरख सूर्यवंशी (४५) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in