Pune : नोकरीच्या आमिषाने ४५ लाखांची फसवणूक; जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तासह चौघांवर गुन्हा

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट लेटरहेड, शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या आणि बनावट स्वाक्षऱ्या - नियुक्तीपत्रांच्या आधारे उमेदवारांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune : नोकरीच्या आमिषाने ४५ लाखांची फसवणूक; जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तासह चौघांवर गुन्हा
Pune : नोकरीच्या आमिषाने ४५ लाखांची फसवणूक; जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तासह चौघांवर गुन्हा
Published on

पुणे : पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट लेटरहेड, शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या आणि बनावट स्वाक्षऱ्या - नियुक्तीपत्रांच्या आधारे उमेदवारांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर, महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शलाका विनायक ढोणे (४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in