पुण्यातील स्पॅनिश कंपनीतील लैंगिक छळाच्या चौकशीचे आदेश

पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित लैंगिक छळप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, १५ दिवसांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
पुण्यातील स्पॅनिश कंपनीतील लैंगिक छळाच्या चौकशीचे आदेश
पुण्यातील स्पॅनिश कंपनीतील लैंगिक छळाच्या चौकशीचे आदेशप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित लैंगिक छळप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, १५ दिवसांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, पुणे जिल्ह्यातील स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर तिला तत्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या प्रकरणात संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कायंदे यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत केली जाईल. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी तसेच महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्धही कारवाई करण्यात येईल. “कोणत्याही परिस्थितीत संबंधित महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनीषा कायंदे यांनी सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) छळ आणि धर्मांतराच्या तक्रारी असल्याचाही आरोप केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात येतील आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in