पुण्यातील शिक्षक मतदानापासून वंचित? प्रा. सचिन सानप यांचा निवडणूक यंत्रणेवर आरोप

आगामी शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप शिक्षक उमेदवार प्रा. सचिन सानप यांनी केला आहे.
पुण्यातील शिक्षक मतदानापासून वंचित? प्रा. सचिन सानप यांचा निवडणूक यंत्रणेवर आरोप
पुण्यातील शिक्षक मतदानापासून वंचित? प्रा. सचिन सानप यांचा निवडणूक यंत्रणेवर आरोपप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

पुणे : आगामी शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप शिक्षक उमेदवार प्रा. सचिन सानप यांनी केला आहे. प्रशासकीय त्रुटी आणि परस्परविरोधी माहितीमुळे हजारो पात्र शिक्षक व प्राध्यापक नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळानुसार शिक्षक व पदवीधर मतदारसंघांसाठी २०२६च्या निवडणुकीकरिता मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी २७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपासून बंद झाल्याचे नमूद आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अर्ज स्वीकारण्याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा प्रा. सानप यांनी केला आहे. ऑनलाइन नोंदणी बंद झाल्यानंतर ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक पात्र शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंख्या घटल्याचा दावा

पुणे विभागातील मतदारसंख्येतील बदलाकडेही प्रा. सानप यांनी लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३२ हजार २०१ नोंदणीकृत शिक्षक मतदार होते. २०२६च्या नव्या मतदार यादीत ही संख्या १२ हजार १८७ इतकी राहिली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही पात्र शिक्षकांची नावे यादीत नसल्याचा दावा त्यांनी केला.

लवकरच तक्रार दाखल करणार

प्रा. सानप यांनी भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुण्याचे विभागीय आयुक्त यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविल्याचे सांगितले. या निवेदनावर अद्याप लेखी उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in