पुण्यातील कोंढव्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात शाळेचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी काम करणारे दोन सुरक्षारक्षक सोमवारी रात्री पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. त्या ठिकाणाहून जात असणाऱ्या काही नागरिकांनी या घोषणा ऐकल्या. यानंतर त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच भागात राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार करणाऱ्या दहशतवाद्यांना अटक केली होती. यांच्या केलेल्या चौकशी त्यांचा देशभरात घातपाती कारवाया करण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली होती.