"मराठी पाट्या लावा नाहीतर...", मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही मनसे आक्रमक

"मराठी पाट्या लावा नाहीतर...", मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही मनसे आक्रमक

नाशिकमधील कॉलेजरोड परिसरात मनसैनिकांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासत जोरदार घोषणाबाजी केली.
Published on

मराठी पाट्या प्रत्येक दुकानांवर असल्याचं पाहिजे. महाराष्ट्रात राहायचा असेल तर मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरेंचं होतं. कोर्टाने मराठी पाट्या लावण्याची २५ पर्यंतची मुदत दिली होती. सगळ्या शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम 1948 अन्व्ये बंधनकारक आहे. असं असतांना देखील नाशिक शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनांवर कोणती ही कार्यवाही महापालिकेकडून होताना दिसत नसल्याचाही आरोप यावेळी आता मनसेकडून करण्यात आला.

याच मुद्दावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून येतं आहे. नाशिकमध्ये दुकानांवर अजूनही इंग्रजी पाट्या लावल्या आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात मनसेने आंदोलन केलं. आज सकाळी 11.30 च्या सुमारास मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासत जोरदार घोषणाबाजी केली. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासलं जाईल. असा इशाराही यावेळी मनसेकडून व्यापाऱ्यांना देण्यात आला. येणाऱ्या दहा दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसेने आधीपासूनच मराठी पाट्या लावण्याबद्दल राज्यात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामध्ये कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतर देखील काही दुकानांवर इंग्रजी पाट्या अजून ही दिसत असल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in