तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका मराठीत, विधेयक विधानसभेत मंजूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका यापुढे मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्या जाणार
तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका मराठीत,  विधेयक विधानसभेत मंजूर
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका यापुढे मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातील विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले असून या निमित्ताने प्रश्नपत्रिकेसह या विद्यापीठातील संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये आता प्रवेश, शिक्षण, अध्ययन आणि अध्यापनासाठी इंग्रजीसोबत मराठीचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विधेयक २०२४ विधानसभेत मांडले. या विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली असून या विधेयकानुसार या विद्यापीठाची विभागीय कार्यालये राज्यभर असावीत, यासाठी सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व कार्यालये त्या-त्या विद्यापीठांच्या कॅम्पसमध्येच असावीत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

logo
marathi.freepressjournal.in