
पोलीस कारवाईच्या आश्वासनानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले आहे. भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे. कसबा पोटनिवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना पुण्यात पैशांचा पाऊस पडत आहे. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडत आहे. या सर्व प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात आले. असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.