केवळ विद्यार्थिनींसाठी राहुल गांधी यांचा पुण्यात संवाद

येत्या २२ ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होणार असून तो केवळ विद्यार्थिनींसाठी असेल असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ विद्यार्थिनींसाठी राहुल गांधी यांचा पुण्यात संवाद
केवळ विद्यार्थिनींसाठी राहुल गांधी यांचा पुण्यात संवाद (संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्लीः येत्या २२ ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होणार असून तो केवळ विद्यार्थिनींसाठी असेल असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. आता मुली बोलतील आणि देश ऐकेल,” असे गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“मोदीजींच्या हिंसक राजवटी- विरोधात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत भारतातील तरुण ज्या धैर्याने आणि चिकाटीने ठामपणे उभे राहिले, ते कौतुकास्पद आहे, असे नमूद करून राहुल यांनी म्हटले आहे की, शांतता, प्रेम आणि विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपला आवाज बुलंद केला.

“आता त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in