Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी सांगितलं आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी लवकर घेण्याचं कारण, म्हणाले...

आमदार अपात्रतेची सुनावणी ही १३ तारखेला होणार होती. ती आता १२ तारखेला घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी सांगितलं आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी लवकर घेण्याचं कारण, म्हणाले...

आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. विरोधक राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भाजपासोबत सत्तेत गेलेल्या आमदारांच्या अपात्रकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारा अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यास मुद्दामहून उशिर करत असल्याचा आरोप करत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

आमदार अपात्रतेची सुनावणी ही १३ तारखेला होणार होती. ती आता १२ तारेखाला घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. १३ तारखेलाच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. परंतु, दिल्लीत p20च्या नियोजित कार्यक्रमामुळे विधानसभेतील सुनावणी ही एक दिवस अगोदर म्हणजे १२ तारखेला होणार आहे.

यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी मी विषयात दिरंगाई नाही तर लवकर सुनावणी घेत आहे. असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे सुनावणी लवकर करायची की विलंब करायचा याबाद्दल प्रत्येकाने विचार करावा, असंही नार्वेकरांनी विरोधकांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांसाठी सुशोभित कोळीवाडा

मच्छीमार नगरच्या सुशोभिकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. मुंबईतील आदर्श कोळीवाडा म्हणून बघण्याची संधी आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. त्या दिवशी मी येथील कामाची पाहणी करुन कामाविषयी कानउघडणी करण्याची गरज होती. ती मी केली. तेथे समाधानकारक काम हाती घेतलं घेतलं गेलं आहे. मला खात्री आहे. की पुढच्या दोन महिन्याच्या आत हे संपूर्ण काम पूर्ण होईल. असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in