
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. "रिया चक्रवर्तीच्या फोनवर 'एयू' नावाने ४४ वेळा फोन आले होते. 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले," असा गंभीर आरोप राहुल शेवाळे लोकसभेत यांनी केला. पण, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले. "राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे," असे आव्हान कायंदे यांनी केले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण या दोन्हींमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप याआधीही करण्यात आले होते. ते म्हणाले, "लोकसभेमध्ये ड्रग्स या विषयावर चर्चा सुरु होती. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत."