Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात: रेल्वेचा फूट ओव्हरब्रिज कोसळला आणि...

चंद्रपूरमधील (Chandrapur) बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा फूट ओव्हरब्रिज कोसळला आणि अनर्थ घडला.
Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात: रेल्वेचा फूट ओव्हरब्रिज कोसळला आणि...

रविवारी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये १३ प्रवासी खाली पडले असून ६ जण ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काझीपेट-पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर जात होते. अचानक पुलाच्या मध्यभागाचा स्लॅब कोसळला आणि ६० फूट उंचीवरून हे प्रवासी थेट रुळावर पडले. यातील काही प्रवासी ओव्हरहेड वायरला धडकल्याने सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in