औरंगाबाद: राज्याच्या परभणी जिल्ह्यात पावसाची यंदा पावसाची तूट ३६.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. परभणी जिल्हा मराठवाडा भागात मोडतो. मराठवाडा भागात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोलनी, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड हे जिल्हे देखील येतात. यंदा नांदेड वगळता यापैकी अन्य कोणत्याही जिल्ह्यात पुरेसा पाउस पडलेला नाही. १ जून पासून परभणी जिल्ह्यात ६३.६ टक्के पाउस पडला आहे. येथे ४३०.६ मीमी पाउस पडणे अपेक्षित आहे. पण यंदा केवळ २७३.९ मीमी पाउसच पडला आहे. जालना जिल्ह्यात २५४.१ मीमी म्हणजे ७३.४ टक्के पाउस झाला आहे. तेथे पावसाची तूट २३.६ टक्के आहे. तसेच औरंगाबाद येथे २३.२ टक्के तर बीड जिल्ह्यात १८.४ टक्के तूट आहे. तसेच हिंगोलीत ८.२ टक्के तूट नोंदली आहे. केवळ नांदेड जिल्ह्यात २३.१ टक्के ज्यादा पाउस झाला आहे. तेथे १ जून पासून ५८०.६ मीमी पाउस पडला आहे. नांदेडमध्ये सरासरी ४७१.५ मीमी पाउस पडतो.