राज्यात दोन दिवसांत पाऊस; संभाजीनगर, नाशिक,जळगावसह 'या' जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'

उन्हाचा कडाका वाढू लागलेला असतानाच राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात दोन दिवसांत पाऊस; संभाजीनगर, नाशिक,जळगावसह 'या' जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'

पुणे : उन्हाचा कडाका वाढू लागलेला असतानाच राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी येलो अलर्टही दिला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

राज्यामधील छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. तर पुणे, सांगली, सातारा, जालना, ठाणे, रायगड, नंदूरबार जिल्ह्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील.

१ मार्च रोजी विदर्भातील वाशीम, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरवती, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे, तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पुण्यात मात्र किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in