Rain update : राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना 'ऑरें' तर काहींना 'येलो' अलर्ट जारी

परतीचा पाऊस अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावताना दिसत आहे.
Rain update : राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची  शक्यता; काही जिल्ह्यांना 'ऑरें' तर काहींना 'येलो' अलर्ट जारी
Published on

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिराने झालं. पावसाळा उशिराने सूरू झाला असूनही ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिली. यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला होता. आता परतीचा पाऊस अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावताना दिसत आहे.

याचं पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून राज्यातील तीन जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह कोकणात येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात परतीचा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यासह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील. तर ठाणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगडला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे 1 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 2 ऑक्टोबरला राज्यभरात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे

राजस्थानमधून पावसाने परतीचा प्रवास सुरू आहे. देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हवामान हळूहळू कोरडे होत आहे. यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहेत. यामुळे आठवड्याच्या शेवटी पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in