राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तायर होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाल्याने यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिराने झालं. यामुळे राज्यात पेरण्या उशिराने झाल्या. यानंतर पाऊस राज्यभरात सक्रिया झाला होता. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिल्याने कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पानवठे आटले. विहीरी तळाला गेल्या. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. पावसाने पुर्ण ऑगस्टमहिना कोरडा काढल्याने अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली.

अशात आता पावसासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तायर होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा उट्टा तयार होण्यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळाल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पश्चिम व उत्तर भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती असल्यामुळे पुढील काही तासात कमी दाबाचा बट्टा तयार होऊ शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ८ सप्टेंबर पर्यंत राज्यात हलक्या पावसाचा अंजाद जारी केला होता. तसंच गेल्या तीन ते चार दिवसांपासून घाट माथ्यावर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडत आहे. आता ७ सप्टेंबरपासून राज्यातील विविध ठिकाणी पाऊस होईल. तसंच मध्य महाराष्ट्रात २४ तासानंतर पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in