मंडल आयोगाविरोधात आवाज उठवाच!भुजबळांचे जरांगे पाटील यांना आव्हान

मनोज जरांगे यांच्यासारखा ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? तीन कोटी लोक मुंबईत आणणार होते. त्यांनी किती लोक आणले, वाशीमध्ये सगळ्यांनी बघितले.
मंडल आयोगाविरोधात आवाज उठवाच!भुजबळांचे जरांगे पाटील यांना आव्हान

मुंबई : मनोज जरांगे यांच्यासारखा ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? तीन कोटी लोक मुंबईत आणणार होते. त्यांनी किती लोक आणले, वाशीमध्ये सगळ्यांनी बघितले. ज्याला लाख म्हणजे काय अन् कोटी म्हणजे काय, हे कळत नाही, तेच आता देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, माझे आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी जरांगे पाटील यांना दिले.

भुजबळ म्हणाले, ‘‘झुंडशाहीपुढे नमते घेऊन लाखो लोकांना ओबीसी आरक्षणात मागच्या दाराने प्रवेश दिला जात आहे. एवढेच नव्हे तर आता सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचे सुरू झाले आहे. त्यामुळे आम्हाला सरकार, प्रशासन आणि न्यायालयाकडे दाद मागावी लागणार आहे. लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याचा आम्ही वापर करणार आहोत. मराठा समाजाचे जे माहितीगार आहेत, अभ्यासक आहेत, ते म्हणतायत की, आम्हाला मराठा म्हणून वेगळे आरक्षण द्या. परंतु, सध्या झुंडशाहीपुढे नमते घेऊन निर्णय घेतले जात आहेत. ते एका जातीसाठी लढत आहेत, मी ३७४ जातींसाठी लढत आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in