राज ठाकरे व नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर एकत्र सभा? अमित ठाकरे यांनी दिली माहिती

राज ठाकरे व नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर एकत्र सभा? अमित ठाकरे यांनी दिली माहिती

पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची रणनीती कशी असावी आणि मनसेचा कसा सहभाग असेल, याबाबत सविस्तर चर्चा अमित ठाकरे केली.
Published on

पुणे : महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर समारोपाची एकत्रित सभा होण्याची शक्यता असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी दिली.

पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची रणनीती कशी असावी आणि मनसेचा कसा सहभाग असेल, याबाबत सविस्तर चर्चा त्यांनी केली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. भाजपला ३०० च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार, असा इशाराही त्यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in