त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंनी केली कानउघडणी ; 'या' गोष्टी जबाबदार

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेचा राज ठाकरेंनी निषेध केला असून त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निर्णय घेणे महत्त्वाचे
त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंनी केली कानउघडणी ; 'या' गोष्टी जबाबदार

"शंभर वर्षांची परंपरा खंडित होऊ नये, त्र्यंबकेश्वरमध्ये प्रथा बंद करणे योग्य नाही". त्याचबरोबर बाहेरच्या लोकांनी यात पडण्याचे कारण नाही. गावातील लोकांना हा निर्णय घ्यायचा आहे. यातून कोणाला दंगल हवी आहे का? जिथे चुकते तिथे हल्लाबोल करणे गरजेचे आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेचा राज ठाकरेंनी निषेध केला असून त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

प्रथा शंभर वर्षे जुनी असेल तर ती खंडित करू नये, बंद करू नये, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे हा गावाचा प्रश्न असल्याने इतरांचा त्याच्याशी काही संबंध नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

या सर्व गोष्टींना सोशल मीडिया जबाबदार आहे आणि त्यावर या गोष्टी पाहायला मिळतात. त्यातून गैरसमज पसरतात. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाहीत, असे सूचक विधान केले.

logo
marathi.freepressjournal.in