राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ५ जुलै रोजी मुंबईत झालेला मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, तो राजकीय मेळावा नव्हता, असे वक्तव्य मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. त्याचे राज ठाकरे यांनी जोरदार खंडन केले आहे.
राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!
संग्रहित छायाचित्र
Published on

नाशिक : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ५ जुलै रोजी मुंबईत झालेला मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, तो राजकीय मेळावा नव्हता, असे वक्तव्य मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. त्याचे राज ठाकरे यांनी जोरदार खंडन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युतीबाबत आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही, माध्यमांच्या एका गटाने आपल्या तोंडून न आलेली वाक्ये टाकली आहेत, असा दावा राज यांनी बुधवारी केल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची शक्यता दुरावू लागली आहे.

‘एक्स’ या सोशल मीडियावरील ‘पोस्ट’मध्ये राज ठाकरे म्हणाले, जर मला कोणतेही राजकीय विधान करायचे असेल, तर मी पत्रकार परिषद घेऊन ते स्पष्टपणे मांडेन. ते म्हणाले की, १४ आणि १५ जुलै रोजी नाशिकमधील इगतपुरी येथे मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी त्यांची अनौपचारिक चर्चा झाली.

मी जे उच्चारलेच नाही ते माझ्या नावाने छापण्यात आले, मी म्हणालो की, महापालिका निवडणुकीपूर्वी परिस्थिती पाहून युतीचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा अनौपचारिक चर्चांना अनौपचारिकच ठेवावे. १९८४ पासून ते पत्रकारितेशी संबंधित आहेत आणि काही पत्रकारांची वागणुकीची पद्धत शोभनीय नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज आणि उद्धव ठाकरे दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह इतर महापालिकांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत उत्सुकता दर्शवली, तर राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

युतीबाबत तुमच्याशी चर्चा करू का?

या चर्चेदरम्यान मला ५ जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या विजय रॅलीविषयी विचारण्यात आले. तेव्हा आपण स्पष्ट केले की, ही रॅली मराठी माणसाच्या विजयासाठी होती, ती राजकीय नव्हती. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीचे काय, त्यावर मी हसून म्हणालो की, मी आता युतीबाबत तुमच्याशी चर्चा करावी का?

अनेकदा एकमेकांविरुद्ध लढत

मुंबई मनपाची निवडणूक, जी शिवसेनेची ताकद मानली जाते, तसेच अन्य मनंपाच्या निवडणूक वर्षाअखेर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि मनसे स्थापन केली. त्यांनी आपल्या पक्षाला "मराठी माणसांचा खरा आवाज" म्हणून सादर केले आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असल्या तरी या भावंडांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध लढत दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in