राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

एकेकाळी नाशिक शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. या शहरावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरे सज्ज झाले आहेत.
राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर
ANI

सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांसाठी प्रत्येक पक्ष रणनीती आखताना दिसत आहेत. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे इंजिनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तयारीला लागल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. नाशिक हे राज्यातील महत्वाचे शहर आहे. एकेकाळी नाशिक शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. या शहरावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरे सज्ज झाले आहेत.

राज ठाकरे हे 19 ते 21 मे दरम्यान नाशिक शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये प्राण फुंकणार आहेत. तसेच नाशिकमध्ये पक्षाला मोठी उभारी देणार आहेत. लवकरच महापालिका निवडणूका जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 2012 ते 2017 या काळात मनसेला नाशिक मनपामध्ये सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये त्यांचे नाशिक शहरात तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे ते नाशिकवर पुर्ण ताकदीने लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरेंचे आज(19 मे) संध्याकाळच्या सुमारास नाशिक शहरात आगमन होणार आहे. ठाकरे हे अनेक महिन्यांनंतर नाशिक दौऱ्यावर मुक्कामी येणार आहेत. उद्या (20 मे) रोजी ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते शासकीय निवास स्थानात नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय आदेश देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मनसेच्या नाशिक शहर अध्यक्षांनी राजीनामा दिला असल्याने राज ठाकरे या जागी कोणाची नियुक्ती करतात हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in