Raj Thackeray : मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार; राज ठाकरे यांची घोषणा

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन उद्यापासून राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौरा करणार असल्याची घोषणा केली.
Raj Thackeray : मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार; राज ठाकरे यांची घोषणा
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे." अशी घोषणा केली. राज ठाकरेंचा कोकण दौरा उद्यापासून सुरु होत आहे. त्यापूर्वी अंबाबाई देवीच्या दर्शनाने कोकणच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच, चांगला तांबडा, पांढरा रस्साचा आस्वाददेखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणच्या दौऱ्याबाबत बरेच दिवस सुरू होते. तर उद्यापासून कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच कोकण संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.

बालेकिल्ला हलत नाही, असं कधी होत नाही : राज ठाकरे

"कुणीही राजकीय रणनीती काय आहे? हे सांगत नाही. कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो. बालेकिल्ले हलत नाहीत, असे होत नाही. प्रत्येक पक्षाचे संघटनेचे अंतर्गत काम सुरु असते. कोल्हापूरच्या महानगरपालिका निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार आहे. तसेच, सध्या महाराष्ट्राचा दौरा सुरु असून निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे." असे मत व्यक्त करत त्यांनी राजकीय प्रश्नांना उत्तर दिले. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी पुण्यातील घरी रिक्षा चालक आंदोलनात सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राज ठाकरेंना दिले. त्यावर, या संदर्भातील व्यक्तीशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो, असा विश्वास दिला.

Raj Thackeray : पुण्यात रिक्षाचालक पदाधिकारी निवेदन घेऊन आले आणि राज ठाकरे म्हणाले, 'आम्ही फक्त...'

logo
marathi.freepressjournal.in