राज ठाकरे ९ जूनपासून पुणे दौऱ्यावर; संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार असून, संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
संग्रहित छायाचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार असून, संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोबत मनसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, मनसे स्वबळावर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेच्या पुणे शहर संघटनेत मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती आहे.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे असतील: पुण्यातील सर्व शाखाप्रमुख बदलण्यात येणार आहेत. मनसे गटप्रमुखांच्या सुद्धा नवीन निवडणुका घेणार आहे. विशेष म्हणजे, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन पद निर्माण करून नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

logo
marathi.freepressjournal.in