भुर्दंड जनतेला का? - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसर करण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहित आरसा दाखवला आहे.
भुर्दंड जनतेला का? - राज ठाकरे
भुर्दंड जनतेला का? - राज ठाकरे
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसर करण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहित आरसा दाखवला आहे. ‘चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?’ असा जळजळीत सवाल करत राज ठाकरेंनी या पत्राद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. सामान्य जनतेला सल्ले देण्याऐवजी सरकारने स्वतःपासून काटकसरीची सुरुवात करावी, असा सल्लाही त्यांनी या पत्रातून दिला आहे.

पंतप्रधान, मंत्री शेकडो गाड्यांसह रॅली काढतात त्याचे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल - डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, ‘वर्कफ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा. हे सगळं का? तर, सोनं, पेट्रोल - डिझेल हे आयात करावे लागते आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असे सांगणार आहात का? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

बॅरलचा भाव कमी असताना लाखकोटी मिळाले ते कुठे गेले?

राज ठाकरे म्हणाले की, सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असे नाही. २००८ ला पुढे २०११- २०१२ मध्ये व २०१३ - २०१४ च्या काळात अशीच परिस्थिती होती. काटकसर करा, हे आवाहन करताना खरे कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचे जे काही कंबरडे मोडून ठेवले आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल - डिझेल विकत होतात. त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले? त्याचं काय झालं? असा खोचक सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in