"तुमच्या पायाखालची जमीन निघून चाललीये याचा अंदाज आहे का?", राज ठाकरेंचा रायगडकरांना संतप्त सवाल

मला फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता. थेट 'जमीन परिषद' नाव देवून जाहीर करायचे नव्हते. मला आजही पत्रकारांवर विश्वास आहे. पेपरमध्ये आले याचा अर्थ लोकांचा विश्वास बसतो. पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे, असे राज यावेळी म्हणाले.
"तुमच्या पायाखालची जमीन निघून चाललीये याचा अंदाज आहे का?", राज ठाकरेंचा रायगडकरांना संतप्त सवाल

"तुम्ही रायगड जिल्ह्यात कोणती जबाबदारी पार पाडायची आहे. यावर मी बोलणार आहे. पुणे, नाशिक, ठाणे मुंबईची वाट लागलीच आहे. तुमच्या पायाखालची जमीन निघून चाललीये याचा तुम्हाला अंदाज आहे? इतर राज्यांतील नेते अलर्ट असतात. त्यांच्या लोकांचा ते पहिले विचार करतात. अलिबागमधील काही गावे संपली, तिथल्या जमिनी गेल्या. तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आज अलिबाग दौऱ्यावर असताना 'जमीन परिषद' कार्यक्रमात बोलताना त्यांनी महत्वाच्या मुद्यावर भाष्य केले.

मला फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता. थेट 'जमीन परिषद' नाव देवून जाहीर करायचे नव्हते. मला आजही पत्रकारांवर विश्वास आहे. पेपरमध्ये आले याचा अर्थ लोकांचा विश्वास बसतो. पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे, असे राज यावेळी म्हणाले.

पैशाची गरज आहे, पण ती विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते. त्याचा मोबदला योग्य मिळतोय का? बहुतांशी दलाल मराठी असल्याने आपला विश्वास बसतो. तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला महागडी विकली जाते. हाताखालच्या जमिनी जात आहेत. ट्रान्स हार्बर, रोरो, सी लिंक, मोठ्या सुविधासांठी जमिनी जात आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

पैसे देऊन बलात्कार सुरु-

महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सर्व बाजूंनी सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, याचे गांभीर्य सर्वांना कळायला हवे. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत, असेही ते म्हणाले.

पुढील चार-पाच वर्षात परिस्थिती हातून निघून जाईल-

सगळे हातातून गेल्यावर कपाळावर हात मारत पश्चाताप करायची वेळ येईल. बाकीचे नेते व्यवहार करीत आहेत. माझा यामध्ये व्यावहार नाही. मी तुम्हाला जाग करतोय. परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरी, पुढील चार-पाच वर्षात परिस्थिती हातून निघून जाईल, असा इशराही राज यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in