"आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि...", रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

अयोध्येत रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
"आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि...", रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

आज संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्येत रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संपूर्ण जग हा सोहळा 'याचि देही याची डोळा', अनुभवत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवरुन रामलल्लाच्या मूर्तीचा एक मनमोहक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी "आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली!जय श्रीराम!", असे म्हणत आपल्या मनातील भावना प्रकट केली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे, अशी राम भक्तांची इच्छा होती. आज कोट्यवधी राम भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे. या सोहळ्याला देशभरातील महत्वाच्या सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली. तसेच, देशभरातील नागरिक हा सोहळा लाईव्ह पाहत आहेत. जागोजागी या सोहळ्याचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

दरम्यान, आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार (24 जानेवारी 2024) पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुले होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in