मी इथेच उभा आहे, त्यांनी खुशाल मला अटक करावी; एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया

"मला अटक करा, तुरुंगात टाका, माझी तयारी आहे. पण माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला ही चुकीची गोष्ट आहे. कृपा करून असे करू नका. माझ्या पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, जाब विचारणार आहोत. लोकप्रतिनिधीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्याची घटना महाराष्ट्रात घडली. यापूर्वी अशी घटना कुठेच घडली नसेल", असे साळवी म्हणाले.
मी इथेच उभा आहे, त्यांनी खुशाल मला अटक करावी; एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया

"ही विजयाची सुरुवात झाली आहे. 2024 हे निवडणूकीचे वर्ष आहे. या निवडणूकीत जनता शंभर टक्के त्यांना त्यांची जागा दाखवेल, मातीतच मिळवेल हा मला विश्वास आहे. मी चौकशीला सामोरे जाईल, मी इथेच उभा आहे. त्यांनी खुशाल मला अटक करावी, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी एसीबीच्या चौकशीवर बोलताना दिली आहे.

"मला अटक करा, तुरुंगात टाका, माझी तयारी आहे. पण माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला ही चुकीची गोष्ट आहे. कृपा करून असे करू नका. माझ्या पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, जाब विचारणार आहोत. लोकप्रतिनिधीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्याची घटना महाराष्ट्रात घडली. यापूर्वी अशी घटना कुठेच घडली नसेल", असे साळवी म्हणाले.

ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदारांना फोडून गेले, तेव्हापासून मी शिंदे गटात जाणार अशी अफवा उठवली जात आहे, पण, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे, शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही म्हणून सरकारचे हे कृत्य आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या कारवाईदरम्यान आपल्याला उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला. "राजन घाबरायचे नाही, रडायचे नाही, आता लढायचे. शिवसेना तुमच्या पाठी आहे, घाबरू नका", असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या शब्दांनी मला बळ मिळाले. याचबरोबर खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि शिवसैनिकांनी आपल्याला फोन करून आधार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास एसीबीने चौकशीसाठी धाड टाकली. साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. यांचे घर, त्यांचे जुने घर, त्यांच्या भावाचे घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू आहे. एसीबीकडून अजूनही झाडाझडती सुरुच आहे. त्यांच्याकडे बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, साळवी यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in