कराड नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव; लोकशाही-यशवंत आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

कराड नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्षपदी लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार व शिंदे शिवसेनेचे नेते राजेंद्रसिह आत्माराम यादव विजयी ठरले.
कराड नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव; लोकशाही-यशवंत आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
कराड नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव; लोकशाही-यशवंत आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
Published on

कराड नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्षपदी लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार व शिंदे शिवसेनेचे नेते राजेंद्रसिह आत्माराम यादव विजयी ठरले. नगरसेवकपदीही लोकशाही-यशवंत विकास आघाडीने २० जागांवर विजय मिळवत पालिकेत बहुमतेची सत्ता मिळवली. भाजपाला या निवडणुकीत दारूण पराभव भोगावा लागला.

नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आणि शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली.लोकशाही-यशवंत विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव २४,०९६ मतांनी विजयी झाले. तर भाजपच्या विनायक गजानन पावसकर यांना १४,३६१ मतांवर समाधान मानावे लागले.

कराड नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव; लोकशाही-यशवंत आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
कराड नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव; लोकशाही-यशवंत आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

कराड शहराला दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा आहे. जनतेने दिलेली संधी आणि विश्वास लक्षात घेऊन आम्ही कराडचा सर्वांगीण विकास करू.

राजेंद्रसिंह यादव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

logo
marathi.freepressjournal.in