Rajesh Tope: जालन्यात अज्ञातांकडून माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड; कारण अस्पष्ट

Rajesh Tope: जालन्यात अज्ञातांकडून माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड; कारण अस्पष्ट

अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफड करण्यात आली आहे. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ही घटना घडली आहे. या हल्ल्यात टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे.

जालन्यात मध्यवर्ती बँकेच्या निडणूका आहेत. त्यानिमित्ताने टोपे हे जिल्हा बँकेत आले होते. यावेळी टोपे यांची गाडी इमारतीजवळ उभी होती. यावेळी त्यांच्या गाडीवर समोरून दगडफेक करण्यात आली. यावेळी त्यांच्यागाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे.

चार ते पाच अज्ञान व्यक्तीने टोपे यांच्या कारवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप हे हल्लेखोर कोन होते आणि त्यांनी नेमकं कोणत्या कारनाने हल्ला केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

माजी मंंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत

logo
marathi.freepressjournal.in