Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीवर राजू पाटील यांनी मांडले 'हे' मत

ते शरद पवार आहेत आणि त्यांच्याबद्दल भाष्य करण्याएवढा मी मोठा नाही. पण, एकंदरीत
Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीवर राजू पाटील यांनी मांडले 'हे' मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) अचानक पक्षाध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केल्याने अनेकांना धक्का बसला. पवारांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. काहींनी या निर्णयाला दबावाखाली उचललेले पाऊल म्हटले, तर काहींनी हा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शरद पवार यांचा राजीनामा देण्याचा निर्णय हा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले आहे.

राजू पाटील म्हणाले, "शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. एक माणूस म्हणून बोलायचे तर त्यांचे वय आणि आजारपण लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता. राज ठाकरे मागे एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते कि, शरद पवार हे कामात वाघ आहेत, मात्र, कुठेतरी थांबायचे असते आणि म्हणून ते थांबले असावेत.

ते शरद पवार आहेत आणि त्यांच्याबद्दल भाष्य करण्याएवढा मी मोठा नाही. पण, एकंदरीत ज्या हालचाली सुरू होत्या, ज्या ऐकू येत होत्या, त्या अफवा असू शकतात, त्या कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असावा,' असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in