Rajya Sabha polls: भाजपने राणेंचा पत्ता कापला; अशोक चव्हाणांचा लगेच नंबर लागला; पण, तिसरा 'सरप्राईज' उमेदवार दिला

भारतीय जनता पक्षाने (भाजप) फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली.
Rajya Sabha polls: भाजपने राणेंचा पत्ता कापला; अशोक चव्हाणांचा लगेच नंबर लागला; पण, तिसरा 'सरप्राईज' उमेदवार दिला

भारतीय जनता पक्षाने (भाजप) फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार भाजपने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजपने महाराष्ट्रातून एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नारायण राणेंचा पत्ता यावेळी कापण्यात आला असून दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षातून आलेल्या अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश आहे.

चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी राजकीयदृष्ट्या विस्थापित झालेल्या मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करत पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पण, नांदेडचे डॉ. अजित गोपछडे हे नाव सर्वात वेगळे ठरले आहे. अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपत कार्यरत आहेत. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. भाजपच्या राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये गोपछडे यांचे नाव कुठेही नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी पक्षाने 'सरप्राईज' दिले आणि गोपछडेंना आपल्या निष्ठेचे फळ मिळाले.

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून मुरली देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.

दरम्यान, गुजरातमधील चार उमेदवारांची नावेही भाजपने जारी केली आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in