असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

आज रत्नागिरीतील खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कडाडून टीका केली
असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

५ मार्चला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमधील गोळीबार मैदानात सभा घेतली होती. यावेळी शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर आज प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळीबार मैदानात भव्य सभा घेतली. या सभेचे नियोजन रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी केले. यावेळी रामदास कदम यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "उद्धवजी, असे १०० जाधव मी खिशात घेऊन फिरतो. आम्ही स्वच्छ हाताने जगलो आहोत, कधीही डाग लावून घेणार नाही."

शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, "उद्धवजी, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली?" असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. ते पुढे म्हणाले की, "२००९मध्ये उद्धव ठाकरेंनी मला गुहागरमधून तिकीट दिले. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून, तुम्ही मला पाडले. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते. या भास्कर जाधवची काय लायकी होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो मी." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या मुलांना वेळोवेळी पाडण्याचे प्रयत्न केले असे आरोप रामदास कदम यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, "बाळासाहेब असेही म्हणाले होते की, ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, तेव्हा शिवसेना नावाचे दुकान मी बंद करून टाकेन. आता बोला उद्धवजी." असे म्हणत टोला लगावला. ते म्हणाले की, "तुमची सभा केवढी झाली. ही सभा केवढी आहे, हे तुम्ही गपचूप लपून बघत असाल. त्या भास्कर जाधवचे कुणी चमचे असतील इथे उपस्थित तर त्यांना म्हणावे, जाऊन बघा, सगळी ट्रॅफिक बंद आहे. इथे असलेल्यांपेक्षा ४ पटीनेअधिक लोक बाहेर थांबले आहेत. शिवाजी पार्कपण कमी पडले असते," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in