प्रसिद्ध निसर्ग कवी, ना. धो. महानोर यांचं आज निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी आपला देह ठेवला. ते ८१ वर्षाचे होते. उद्या मराठवाड्यातील पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा कोसळली आहे.
कवी ना. धो. महानोर हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असल्याने २० दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालावली.
ना. धो. महानोर यांच्या जन्म मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे या ठिकाणी झालं होतं. यानंतर त्यांनी जळगावातील महाविद्यालयाच प्रवेश घेतला. मात्र, त्यांनी फक्त पहिल्याचं वर्षी महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं.
यानंतर ते शेती कसण्यासाठी आपल्या गावी परतले. रानकवी म्हणून ते अवघ्या साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकविंचा प्रभाव जाणवतो. त्यांनी 'पानझड', 'तिची कहाणी', 'रानातल्या कविता' या गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली आहेत.