जेएन-१ चा देशात वेगाने प्रसार ;महाराष्ट्रासह सहा राज्यांत आढळले रुग्ण

देशात सध्या ३ हजार ७४२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. २४ डिसेंबर रोजी देशातील सहा राज्यांत जेएन -१ चे ६३ रुग्ण सापडले आहेत
जेएन-१ चा देशात वेगाने प्रसार ;महाराष्ट्रासह सहा राज्यांत आढळले रुग्ण
PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातही कोरोनाचा उपप्रकार असलेल्या जेएन-१ चा प्रसार वेगाने होतो आहे. केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर आठवड्यातच जवळपास सहा राज्यांत या विषाणूने शिरकाव केला आहे. यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

देशात सध्या ३ हजार ७४२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. २४ डिसेंबर रोजी देशातील सहा राज्यांत जेएन -१ चे ६३ रुग्ण सापडले आहेत. यापैकी गोव्यात ३४, महाराष्ट्रात ९, कर्नाटकात ८, केरळात ६, तामिळनाडूमध्ये ४ तामिळनाडू आणि २ तेलंगणातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या जेएन-१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असे वर्गीकरण केले आहे. हा विषाणू लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा नसला तरी त्याचा प्रसार वेगाने होत आहे, ही बाब चिंतेची आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून वाचवत आहेत, असे निवेदन जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. याआधी जेएन-१ विषाणूचा मूळ वंश बीए.२.८६ लाही ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात टाकण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in