राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला की फणसाळकर?

पोलीस महासंचालकपदाची घोषणा सोमवारी अधिकृतपणे होण्याची चर्चा आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचेही नाव पोलीस महासंचालकपदाच्या चर्चेत आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला की फणसाळकर?

मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक झाल्याची जोरदार चर्चा आहे. पण, राज्याच्या गृहखात्याने याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पोलीस महासंचालकपदाची घोषणा सोमवारी अधिकृतपणे होण्याची चर्चा आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचेही नाव पोलीस महासंचालकपदाच्या चर्चेत आहे.

१९८८ च्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी असलेल्या शुक्ला यांचे नाव पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर असले तरीही मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचेही नाव पुढे चालले आहे. फणसाळकर यांना महायुती सरकार व मागील महाआघाडी सरकारच्या काळातही मान्यता होती. मुंबईचे आयुक्त म्हणून त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. अनेक तणावपूर्ण वातावरण त्यांनी कुशलतेने हाताळले आहेत. त्यामुळे सध्याच्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या गोंधळात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस महासंचालकपदासाठी फणसाळकर यांचे नाव घेतले जात आहे. शुक्ला सध्या केंद्र सरकारच्या सेवेत आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त, राज्याच्या गुप्तचर विभागात त्यांनी काम केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील गुन्हे रद्दबातल ठरवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in