अभिमानास्पद! उद्योजग रतन टाटा 'उद्योगरत्न' पुरस्काराचे पहिले मानकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रतन टाटा यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
अभिमानास्पद! उद्योजग रतन टाटा 'उद्योगरत्न' पुरस्काराचे पहिले मानकरी

दिग्गज उद्योगपती, टाटासमुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रतन टाटा यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार उद्योगपती रतन टाटा यांनी दिला आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली होती. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदापासून हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल असं सांगण्यात आलं होतं.

साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रात अलोकिक कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जातं. याच धर्तीवर या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. टाटा घराणं देशातल्या सर्वात जुन्हा उद्योजकांपैकी एक आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीत टाटा समुहाची मोठी भरभराट करून दाखवली. आजही ते टाटा समुहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in