आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे आपली पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते.
आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुट्टीत देवदर्शनासह मौजमजा करण्यासाठी आरेवारे समुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाले. त्यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर (३३) यांचा बुडून मृत्यू झाला.

पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे आपली पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. सालाबाद प्रमाणे यावर्षीही गाडेकर कुटुंब रविवारी अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन लाभ घेतल्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्याने त्या समुद्रात न जाता गाडेकर कुटुंबीय आरेवारे येथील समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी गेले. परंतु गाडेकर कुटुंबीयांतील पंकज गाडेकर, मयुरी गाडेकर, बालाजी गाडेकर व त्यांचा एक भाचा असे एकूण चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेला मोठ्या लाटेने पंकज गाडेकर हे त्या लाटेबरोबर आत ओढले गेले. समुद्राच्या पाण्यात ते जात असल्याचे लक्षात येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता. यावेळी किनाऱ्यावर असलेल्या त्यांच्यासमवेत आलेल्या मुले, महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले.

परंतु पंकज गाडेकर यांची प्रकृती चिंताजनक होती. याप्रकरणी चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in